मुंबई

भातसाचे १०० दशलक्ष लिटर पाणी होणार शुद्ध: पांजरापूर येथे २०० कोटी खर्चून प्रकल्प उभारणार; अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर

Sagar Sirsat

मुंबई : मुंबईला शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथे १०० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भातसा धरणातील १०० दशलक्ष लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी मुंबई महापालिका तब्बल २०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार

असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले. मोडक सागर मध्य वैतरणा अप्पर वैतरणा भातसा तानसा विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. भातसा धरणातून मुंबईला दररोज दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यापैकी पांजरापूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात १३६५ दशलक्ष लिटर पाणी शुद्ध करण्यात येते. तर ६०० दशलक्ष लिटर पाणी भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येते. भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पात ६०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी मुंबईला पुरवठा केला जातो. परंतु तालुका भिवंडी, ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथे जागा उपलब्ध असून, याठिकाणी नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पांजरापूर येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारल्यानंतर तेथे १०० दशलक्ष लिटर पाणी शुद्ध करत ते थेट मुंबईला पुरवठा करण्यात येईल, असे पाणीपुरवठा प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले. पांजरापूर येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

भांडुपला जलशुद्धीकरण प्रकल्प

मुंबईला स्वस्त व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या जल विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. मुंबईकरांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून भांडुप संकुलात दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस