संग्रहित फोटो
मुंबई

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १५ दिवसांचा 'अल्टीमेटम'

१५ दिवसांत खड्डेमुक्त रस्ते निदर्शनास नाही आले तर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिली आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई

लाडक्या गणरायाच्या आगमनाला २० दिवस शिल्लक आहेत. बाप्पाच्या आगमनाआधी खड्ड्यांचे विघ्न दूर करा, ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा, असा ‘अल्टीमेटम’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिला आहे. १५ दिवसांत खड्डेमुक्त रस्ते निदर्शनास नाही आले तर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिली आहे.

यंदा पावसाचा जोर चांगलाच होता. राज्यातील अनेक भागात अतिमुसळधार पाऊस पडला आणि राज्यातील जनता सुखावली. मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे विघ्न आले आहे. त्यातच ७ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणरायाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न ३१ ऑगस्टपर्यंत दूर करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देताच रस्ते विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाची पळापळ सुरू झाली आहे.

मुंबई-नाशिक महामार्ग, ठाणे-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य बघताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आले आणि तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश १ ऑगस्ट रोजी संबंधित यंत्रणांना दिले. मात्र आता लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. राज्यात गणरायाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र दरवर्षीप्रमाणे बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न असतेच. यंदा ७ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मेल एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल झाले तर चाकरमानी खासगी बसेस अथवा गाड्यांनी कोकण गाठतात. मुंबई-गोवा महामार्गावर असो वा मुंबई-नाशिक महामार्गावर, ठाणे-नाशिक महामार्गावर प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील रस्ते खड्डे मुक्त करा, असे आदेश जारी केले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आदेश

  • जिओ पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर

  • खड्डेमुक्त रस्त्यांचे व्हिडीओ शूटिंग

  • वाहतूक नियंत्रणातील त्रुटी दूर करा

  • वाहतुकीवर ड्रोनद्वारे नजर

  • धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती