मुंबई

बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढ, पाच दिवसांचा आठवडा ;इंडियन बँक असोसिएशनचा प्रस्ताव

बँक कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास वाढतील व त्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळेल

नवशक्ती Web Desk

मुंबई : सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव व पाच दिवसांच्या आठवड्याचा प्रस्ताव इंडियन बँक असोसिएशनने ठेवला आहे. मात्र, काही कामगार संघटनांनी वेतनात आणखी वाढ करण्याची मागणी केली आहे.

पीएनबीसारख्या बँकांनी वेतनवाढीसाठी मोठी तरतूद करण्यास सुरुवात केली आहे. पीएनबी बँक १५ टक्के वेतनवाढीबरोबरच १० टक्के अतिरिक्त वेतनवाढ करण्याचे बजेट बनवत आहे. याचाच अर्थ पीएनबीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के वाढ होऊ शकते.

कामगार संघटना व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, २०२४ च्या सप्टेंबरच्या तिमाहीत बँकांनी चांगला नफा कमवला आहे. कोविडच्या काळात कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम करून सरकारी योजनांना प्रोत्साहन दिले. तसेच कर्जदारांना पुन्हा मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मोबदल्यावर योग्य हक्क आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्के वाढ झालीच पाहिजे.

निवडणुकीपूर्वी वेतनवाढीची भेट

पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या निर्णयाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. २०२० पासून बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

तसेच बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कामाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास वाढतील व त्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळेल.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी

अमेरिकेचे व्हिसास्त्र! भारतीयांच्या 'अमेरिकन ड्रीम'ला ट्रम्प यांचा सुरुंग; नव्या H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये शुल्क आकारणार