मुंबई

पांडेंविरुद्ध ३ गुन्हे दाखल

वृत्तसंस्था

एनएसई’ अर्थात ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’मधील सर्व्हर घोटाळाप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी सकाळपासून देशभरात १८ ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनादेखील नोटीस बजावण्यात आली होती. ईडीने देखील त्यांची चौकशी केली असून त्यासंदर्भात संजय पांडे यांच्याव्यतिरिक्त एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध एनएसई अधिकाऱ्यांचे फोन टॅप करणे आणि इतर अनियमितता केल्याप्रकरणी नवीन ३ गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय पांडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
देशभरात सीबीआयने याप्रकरणी १८ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात मुंबईत ८, पुण्यात २, चंदिगड १, लखनऊ आणि कोटा येथे प्रत्येकी एक, तर दिल्ली एनसीआरमध्ये ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.


काय आहे एनएसई घोटाळा?
आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. ही सॅाफ्टवेअरशी संबंधित कंपनी २००१ मध्ये संजय पांडे यांनी ते सेवेत नसताना स्थापन केली. सेवेत रुजू झाल्यावर पांडे यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा २००६ मध्ये राजीनामा दिला. या कंपनीत पांडे यांचे तकुटुंबीय संचालक आहेत. ‘झावबा कॉर्प’वर उपलब्ध माहितीवरून संतोष पांडे हे २००३ पासून या कंपनीचे पूर्णवेळ संचालक आहेत. या कंपनीवर एनएसईने २०१० ते २०१५ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सॉफ्टवेअरसंबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविली होती. सर्व्हरमध्ये फेरफार होऊनही त्याबाबतची कल्पना लेखापरीक्षण कंपनीला कशी मिळाली नाही? की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातच संजय पांडेंची सध्या चौकशी सुरू आहे.

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?