मुंबई

जुहूमध्ये ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार, ७५ वर्षीय व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल; डी गॅंग चे नाव केले समोर

आंबोली पोलिस ठाण्यात या व्यावसायिकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे

वृत्तसंस्था

मुंबईतील जुहू परिसरात एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ७५ वर्षीय व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने अत्याचार पीडितेला धमकी दिली आणि तिने पोलिसात तक्रार केल्यास तो तिला ठार मारेल, असे सांगितले. मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात या व्यावसायिकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी व्यावसायिकाने पीडित महिलेकडून 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते परत केले नाही. तसेच पीडित महिलेने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी व्यावसायिक आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांनी तिला ठार मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल