मुंबई

फ्लडिंग पॉइंट्सवर ४०० बसेस तैनात; रेल्वे प्रवाशांसाठी खास सुविधा

नवशक्ती Web Desk

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची लाईफ लाईन ठप्प झाली, तर लोकल प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमाने धाव घेतली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील २५ हून अधिक फ्लडिंग पॉइंट्सवर तब्बल ४०० बेस्ट बसेस तैनात करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नालेसफाई, रेल्वे हद्दीतील नाल्यांची सफाई, छोटी गटारातील गाळ उपसा करण्याचे काम सुरू आहे. मात्र मुंबईत हलक्या सरी बरसल्यानंतर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचते. तर कुर्ला, सायन, माटुंगा, परळ, वडाळा, शिवडी, अंधेरी, सांताक्रुझ आदी मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीतील रुळ पाण्याखाली जातात आणि मुंबईकरांची लाईफ लाईन ठप्प होते. लाईफ लाईन ठप्प झाली म्हणजे मुंबई ठप्प होते असे चित्र दरवर्षी पावसाळ्यात पहावयास मिळते. त्यामुळे रेल्वे हद्दीत रेल्वे रुळ पाण्याखाली जाणाऱ्या स्पॉटवर ४०० बसेस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

७ जूनपासून मुंबईसह परिसरात पावसाची दमदार इनिंग सुरु होते. उसंती घेत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी जमा होते. पावसाळ्यात मुंबईत आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास मुंबई महापालिका, एनडीआरएफ, नेव्हीची पथके अलर्ट मोडवर ठेवण्यात येतात. यंदा तर एनडीआर एफच्या दोन अतिरिक्त टीम अशा एकूण ५ टीम तैनात करण्यात येणार आहेत. मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळख असलेली मुंबई उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक पावसाळ्यात कोलमडते. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत २५ फ्लडिंग पॉइंट्स असून दरवर्षी या फ्लडिंग पॉइंट्सवरील रुळ पाण्याखाली जातात आणि प्रवाशांचे मेगा हाल होतात. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात बेस्ट उपक्रमाने रेल्वे हद्दीतील २५ फ्लडिंग पॉइंट्सवर बसेस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

या रेल्वे स्थानकाजवळ बसेस तैनात

मस्जिद बंदर, सेंडहास्टॅ रोड, भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, वडाळा, शिवडी व टिळक नगर, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी जमा होते. रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी या ठिकाणी बसेस तैनात करण्यात येणार आहेत.

होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश

जनमताचा आरसा इंडियाच्या बाजूने

सत्ता गेल्यावर मागे राहिल, कटकारस्थानांची कुरुपता

"मोदी...तेवढी तुमची लायकी नाही..." नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?