५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेकडे रवाना; साडेसहा फूट उंच भव्य मूर्ती न्हावाशेवा बंदरातून परदेशी वारीला प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेकडे रवाना; साडेसहा फूट उंच भव्य मूर्ती न्हावाशेवा बंदरातून परदेशी वारीला

पर्यावरणपूरक बाप्पा गेल्या अनेक वर्षांपासून सातासमुद्रापार अमेरिकेतील गणेशभक्तांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होत आहे.

Swapnil S

ठाणे : पर्यावरणपूरक बाप्पा गेल्या अनेक वर्षांपासून सातासमुद्रापार अमेरिकेतील गणेशभक्तांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होत आहे. यंदाही श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या प्रथमेश इकोफ्रेंडली आर्टने साकारलेल्या ५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेतील टेक्साससह विविध शहरांसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या पाठवणीत तब्बल साडेसहा फूट उंचीच्या भव्य गणेशमूर्तीचाही समावेश आहे.

परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारतीय संस्कृतीशी नाळ जोडून ठेवणारा महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा उत्सव तितक्याच भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मागील काही वर्षांत पर्यावरणाबाबतची जागरूकता वाढल्याने परदेशातील गणेशभक्तांकडूनही इकोफ्रेंडली मूर्तींना मोठी मागणी वाढली आहे.

प्रथमेश इकोफ्रेंडली आर्टमध्ये तयार होणाऱ्या या मूर्ती कागदी लगद्यापासून बनवल्या जातात. मूर्ती निर्मितीत सुमारे ६० टक्के कागद, ३० टक्के गोंद आणि १० टक्के गुजरातमधून आणलेली विशेष व्हायटिंग माती वापरण्यात येते. या मिश्रणामुळे मूर्ती हलक्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक बनतात. विसर्जनानंतर त्या सहज विरघळून पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम करत नाहीत.

बाप्पा ही श्रद्धेची ओळख आहेच, पण आता तो पर्यावरणप्रेमाचाही संदेश देत आहे. जगभरातील गणेशभक्त मूर्ती निवडताना पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही परदेशात इकोफ्रेंडली मूर्ती पाठवत आहोत. यंदाही मूर्ती वेळेत आणि सुरक्षितपणे गणेशभक्तांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
संदीप गजाकोश, प्रथमेश इकोफ्रेंडली आर्ट

Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार

तीन वर्षीय विधी CET प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार

समुपदेशनाद्वारे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; आरोग्यमंत्री, राज्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी

इंडिया आघाडीची आज बैठक; काँग्रेससह २३ पक्ष एकत्र येणार

गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर कारवाई; दोन कोटी किमतीचा गुटखा जप्त