मुंबई : भारतातील नामवंत तंत्रज्ञान शिक्षण संस्था आयआयटी-बॉम्बेला संशोधन व विकासासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी २०२१-२२ व २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मिळालेला निधी २२ टक्क्याने अधिक आहे. यापूर्वी ५७६ कोटी व ५०२ कोटी रुपये अनुक्रमे संशोधन व विकासासाठी संस्थेला मिळाले होते. सरकार व खासगी कंपन्यांकडून हा निधी मिळाला.
आयआयटी मुंबईने अनेक बहुउद्देशीय संशोधन केंद्रे उघडली. या केंद्राच्य माध्यमातून अनेक गुंतागुंतीच्या समस्यांवर विविध शाखेचे संशोधक तोडगा काढतात.
या संस्थेचे विद्यार्थी व प्राध्यापक विज्ञान, अभियांत्रिकी, डिझाईन, मॅनेजमेंट, मानव्यता आदी संशोधन प्रकल्प राबवतात. सरकार व खासगी संस्थाकडून मिळणाऱ्या निधीतून आयआयटी मुंबई ही संस्था ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ हा राज्य सरकारचा ड्रोनचा प्रकल्प आयआयटी, मुंबईकडून राबवला जात आहे. ड्रोन तंत्रज्ञानात महाराष्ट्र हा जागतिक क्षेत्रात अव्वल असावा, अशी या प्रकल्पामागील भूमिका आहे. तसेच उच्च तांत्रिक शिक्षण देणारी पुस्तके मराठी भाषेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केली जावीत, असा दुसरा प्रकल्प आहे. यासाठी राज्य सरकारने १५१.८ कोटी रुपये आयआयटीसाठी दिले आहे. यासाठी ५ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
या सर्व संशोधनाबरोबरच आयआयटी, मुंबईत मूलभूत विज्ञानात संशोधन करत आहे. सरकारी विभाग, उद्योग व समाजाला व्यवहार्य उपाय आयआयटी, मुंबईमार्फत दिल्या जात आहेत.