मुंबई

रुळाजवळील पेटीचा दरवाजा उडाल्याने ८ प्रवाशी जखमी

मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते नाहूर स्थानकादरम्यान सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलमधील दरवाजावर लटकलेल्या प्रवाशांना मंगळवारी दुखापत झाली. रेल्वे रुळाजवळील एका लोखंडी पेटीचा दरवाजा उडाल्याने आठ प्रवासी जखमी झाले. राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना घरी सोडले.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते नाहूर स्थानकादरम्यान सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलमधील दरवाजावर लटकलेल्या प्रवाशांना मंगळवारी दुखापत झाली. रेल्वे रुळाजवळील एका लोखंडी पेटीचा दरवाजा उडाल्याने आठ प्रवासी जखमी झाले. राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना घरी सोडले.

कर्जत - सीएसएमटी जलद लोकल मंगळवारी दुपारी १२.५० वाजण्याच्या सुमारास सीएसएमटीच्या दिशेने धावत होती. ही गाडी मुलुंड पास झाल्यानंतर नाहूर दरम्यान एका लोखंडी पेटीचा दरवाज्याचा पत्रा जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या आणि दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांना लागला. या घटनेत आठ प्रवासी जखमी झाले. या घटनेची रेल्वेमार्फत चौकशी करण्यात येत आहे.

या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना रुळाजवळील ५ फूट उंच पेटीचा लोखंडी दरवाजा वायरने बांधून बंद केल्याचे दिसले. तसेच या दरवाजाची बिजागिरी गंजल्याने ढिली होऊन आतील इंटरलॉक उघडून तो दरवाजा हवेने उघडला.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त