मुंबई

मध्य रेल्वेच्या ९२ उन्हाळी स्पेशल गाड्या; मुंबई-बनारस, गोरखपूर- मऊदरम्यान धावणार

शाळा कॉलेजना सुट्टी पडताच बहुतांश लोक गावी जातात. मुंबईतही सुट्टी पडल्याने गावी जाणाऱ्यांची धावपळ सुरू आहे. गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेने उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : उन्हाळी सुट्टी पडल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने मुंबई-बनारस, गोरखपूर-मऊदरम्यान ९२ उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या अतिरिक्त गाड्यांचे तिकीट आरक्षण मंगळवारपासून करता येणार आहे.

शाळा कॉलेजना सुट्टी पडताच बहुतांश लोक गावी जातात. मुंबईतही सुट्टी पडल्याने गावी जाणाऱ्यांची धावपळ सुरू आहे. गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेने उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटी-बनारस साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या)

  • ०११४७ साप्ताहिक विशेष गाडी : २१ एप्रिल ते १९ मे पर्यंत दर रविवारी २.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ८ वाजता बनारस येथे पोहोचेल. (५ फेऱ्या)

  • ०११३८ साप्ताहिक विशेष गाडी : २२ एप्रिल ते २० मे पर्यंत दर सोमवारी ११ वाजता बनारस येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल. (५ फेऱ्या)

  • या थांब्यावर थांबणार : दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी.

सीएसएमटी-गोरखपुर साप्ताहिक विशेष (१२ फेऱ्या)

  • ०११६९ साप्ताहिक विशेष गाडी: १९ एप्रिल ते २४ मे पर्यंत दर शुक्रवारी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ८.२० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. (६ फेऱ्या)

  • ०११०२ साप्ताहिक विशेष गाडी : २० एप्रिल ते २५ मे पर्यंत दर शनिवारी ११.२० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल.

  • या थांब्यावर थांबणार : दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी