मुंबई

योगशिक्षिकेचा विनयभंग; आरोपीला अटक

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांनी विश्वकर्माला चांगलाच चोप दिला आणि जोगेश्वरी स्थानकांत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून विश्वकर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : खच्चाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये एका २५ वर्षीय योगशिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता वांद्रे ते गोरेगांवदरम्यान हा प्रकार घडला. २५ वर्षीय तरुणी तिच्या मित्रासोबत प्रवास करत असताना ते सर्वसाधारण डब्यातून जात होते. वांद्रे स्थानकाहून ट्रेन निघाल्यानंतर आरोपी प्रवण विश्वकर्मा याने तिच्या अंगाला स्पर्श केला.

गर्दीचा फायदा उठवून त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने लगेच आरडाओरड करून याबाबतची माहिती आपल्या मित्राला दिली. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांनी विश्वकर्माला चांगलाच चोप दिला आणि जोगेश्वरी स्थानकांत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून विश्वकर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प