मुंबई

२४ हजारांच्या लाचप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

Swapnil S

मुंबई : मुलुंडच्या नाहूर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ हजाराच्या लाचप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. त्यात संजय मुंजाजीराव घोडजकर, दिपा अर्जुन गुजरे आणि सिद्धेश विकास मोरे यांचा समावेश आहे. नाहू येथे सह दुय्यम निबंधक कार्यालय असून तिथेच संजय घोडजकर हे सह दुय्यम निबंधक, दिपा गुजरे ही वरिष्ठ लिपीक म्हणून काम करतात. यातील तक्रारदार एका खासगी सल्लागार संस्थेत काम करतात. ही संस्था विविध दस्तावेज नोंदणी, अभिहस्तांतरण, अधिकार अभिलेखात नाव दाखल करणे आणि इतर प्रकारच्या दस्तावेज नोंदणीचे काम करते. १५ फेब्रुवारला त्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या काही दस्तावेजाची नाहून येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली होती. या दस्तावेजाच्या कागदपत्रांची स्कॅनिंग करून देण्यासाठी तसेच मूळ दस्तावेज प्रत देण्यासाठी संजय घोडजकर यांनी त्यांच्याकडे २५ हजाराची लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचेची मागणी करणाऱ्या संजय घोडजकर यांच्यासह वरिष्ठ दिपा गुजरे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा