X
मुंबई

ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

Swapnil S

मुंबई : उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालावरून शिंदे गट व ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना याच मतदारसंघातील मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मतमोजणी केंद्रात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस व त्यांच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला. पण त्यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी मतमोजणी केंद्रात ईव्हीएमशी संबंधित एक मोबाईल वापरल्याप्रकरणी रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ठाकरे गटाचे विधान परिषदेचे सदस्य विलास पोतनीस व त्यांच्या सुरक्षारक्षकावर वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था