मुंबई

सिलिंडर स्फोटाने गोवंडी हादरली; १०-१५ गोदामांसह घरातील सामान आगीत खाक

Swapnil S

मुंबई : गोवंडी पश्चिम बैंगण वाडी येथील तळ अधिक एक मजली चाळीत शनिवारी पहाटे आग लागली. काही वेळात आग वाऱ्यासारखी पसरली आणि एक ते दोन सिलिंडर ब्लास्ट झाल्याने गोवंडी परिसर हादरला. या दुर्घटनेत १० ते १५ गोदामासह पहिल्या मजल्यावरील घरातील सामान आगीत जळून खाक झाले. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नसून, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

गोवंडी पश्चिम आदर्श नगर, बैंगण वाडी रोड नंबर १३ येथे तळ अधिक एक मजली चाळ आहे. चाळीच्या तळ मजल्यावर भंगाराची गोदाम असून चाळीच्या पहिल्या मजल्यावर रहिवासी राहतात. शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका गोदामात शॉर्टसर्किटमुळे आग लागली असा अंदाज आहे. आग काही वेळात पसरली आणि एक ते दोन सिलिंडर ब्लास्ट झाले. यामुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. सिलिंडर ब्लास्टने आग आणखी भडकली आणि ५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर असलेले १० ते १५ गोदामे जळून खाक झाली, तर चाळीच्या पहिल्या मजल्यावर आगीचे लोण पसरल्याने घरातील एसी यंत्रणा, कापडी पडदे, प्लास्टिक सिट्स, लाकडी फर्निचर आदी सामान जळून खाक झाले.

दरम्यान, स्थानिक पोलीस, स्थानिक वॉर्डचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी पुढील तपास करीत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल