मुंबई

७० लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन मित्राने पलायन व्यापार्‍याच्या तक्रारीवरुन आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा

चोरीनंतर तो राजस्थानला पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई - झव्हेरी बाजार येथे सोन्याचे दागिने विक्रीसाठी आलेल्या एका व्यापार्‍याच्या मित्रानेच सुमारे ७० लाखांचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी व्यापार्‍याच्या तक्रार अर्जावरुन एल. टी मार्ग पोलिसांनी आरोपी मित्र जगदीश बगाराम माळी याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. शहाबुद्दीन इक्बाल मंडई हे सोन्याचे व्यापारी असून ते जोगेश्‍वरी परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. शुक्रवारी ते त्यांचा मित्र जगदीशसोबत झव्हेरी बाजार येथील अरिहंत टच सेंटमध्ये सोन्याचे दागिने विक्रीसाठी आले होते. सोन्याचे वजन करताना त्यांचा मित्र त्यांच्याकडील १२७० ग्रॅम वजनाचे सुमारे सत्तर लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला होता. हा प्रकार नंतर शहाबुद्दीनच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मोबाईलवर संपर्क केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. मित्रानेच दागिने पळविल्याचे लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जगदीशविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. जगदीश हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. चोरीनंतर तो राजस्थानला पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर

जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य