मुंबईतील मोकळ्या जागा भाजपकडून हडपण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

मुंबईतील मोकळ्या जागा भाजपकडून हडपण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईतील मोकळ्या जागांच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील मोकळ्या जागांच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. भाजपच्या आमदारांशी संबंधित एका खासगी ट्रस्टला मुंबईतील १६ एकर मोकळी जागा, क्रीडा संकुल आणि म्हाडाचे दोन प्लॉट्स नाममात्र किंवा मोफत दरात देण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

“मुंबईतील सार्वजनिक जागा, मैदाने आणि भूखंड हडप करून ते बिल्डर आणि कंत्राटदार मित्रांच्या फायद्यासाठी वापरण्याचे धोरण सरकार राबवत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

“मुंबईतील जी मोकळी मैदाने सामान्य नागरिक, मुले आणि खेळाडूंसाठी उपलब्ध होती, त्या ठिकाणी आता अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” अशा सूचनाफलक लावण्यात येत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

महापालिकेत सत्ता असताना सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत सर्व मोकळी मैदाने नागरिकांसाठी मोफत खुली ठेवण्याचे धोरण होते, मात्र आता अनेक मैदानांवर टर्फ उभारून सामान्य नागरिकांना दूर ठेवले जात आहे,” असा दावाही त्यांनी केला.

आंदोलनाचा इशारा

१६ एकर जागा खासगी ट्रस्टला देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे पक्ष येत्या आठवड्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहे. या आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, एनजीओ, हाऊसिंग सोसायट्या आणि मुंबईप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. मुंबईतील सार्वजनिक जागांचे संरक्षण करण्यासाठी मोठा जनआंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मतदार अर्ज १७ ऑगस्टपर्यंत भरा! मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Mumbai : आंबेडकर भवन पाडकाम तपास SIT कडे वर्ग करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला

राज्यात ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती सुरू; शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांची माहिती

रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंढेंना नाव न घेता तंबी

Thane : जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत ३१ जणांचा मृत्यू; २३ जण जखमी, भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १५ बळी