मुंबई

आगे आगे देखो होता है क्या, देवेंद्र फडणवीस यांची सूचक प्रतिक्रिया

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत सर्वच पक्षांचे चांगले आणि बडे नेते आमच्या संपर्कात असून आगे आगे देखो होता है क्या असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.

जे जनतेशी कनेक्ट आहेत असे अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुंबईतल्या काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. वॉर्ड क्रमांक ८२ मध्ये दोन टर्म काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगदीश कुट्टी अमिन आणि वॉर्ड क्रमांक २१६ चे माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड, भालचंद्र शिरसाट, अमरजीत मिश्र आणि माजी नगरसेवक मुरजी पटेल आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबईकडे काही जण सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहत होते. मुंबईसाठी काहीच केले नाही, तर कोविडमध्ये जेव्हा मुंबईकर उपचारासाठी धडपड होते तेव्हा हे लोक भ्रष्टाचार करीत होते. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय हे यांनी दाखवून दिले आहे. अशा भ्रष्टाचारातून मुंबईकरांची सुटका करून जेव्हा निवडणूक होईल तेव्हा भाजप महायुतीचा विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करीत देवेंद्र फडणवीस यांनी प्रवेश केलेल्या दोन्ही माजी नगरसेवकांचे स्वागत केले.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!