मुंबई

‘आरे’त कार डेपोसाठी १२१ झाडांवर कुऱ्हाड

एमएमआरसीच्या मेट्रो रेलगाड्यांची देखभाल करण्यासाठी येथे शंटिंग लाईन टाकून कार डेपो बांधण्यात येणार आहे.

अतिक शेख

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) आरे कॉलनीतील नियोजित कार डेपो स्थळावर सोमवारी पर्यावरणवादी आणि राजकीय विरोध झुगारून कडक पोलीस बंदोबस्तात १२१ झाडांची कत्तल करण्यात आली. येथे एकूण १७७ झाडे तोडण्यात येणार असून, उर्वरित झाडांचे अन्य ठिकाणी प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.

एमएमआरसीच्या मेट्रो रेलगाड्यांची देखभाल करण्यासाठी येथे शंटिंग लाईन टाकून कार डेपो बांधण्यात येणार आहे. त्यासाठी या भूखंडावरील एकूण १७७ वृक्ष तोडावे लागणार आहेत. एमएमआरसीच्या कफ परेड-वांद्रे-सीप्झ या ३३.५ किमी महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो रेल प्रकल्पासाठी ही वृक्षतोड आवश्यक आहे. ही झाडे तोडल्याशिवाय काही शंटिंगसाठी रेल्वे रूळ टाकणे शक्यच नाही. त्यानंतरच मेट्रो गाड्या या प्रस्तावित डेपोमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. अलीकडेच लावण्यात आलेली झाडे वाढल्यामुळे तोडाव्या लागणाऱ्या झाडांची संख्या वाढली असल्याची माहिती एमएमआरसीने न्यायालयाला दिली आहे. १७७ झाडे कापण्यासाठी परवानगी मिळाली असून, आणखी झाडे कापण्यासाठी अथवा प्रत्यारोपित करण्यासाठी परवानगीची गरज नसल्याचे एमएमआरसी अधिकाऱ्याकडून समजले आहे.

कार डेपो आरेमध्ये करण्यासाठी विद्यमान सरकार आग्रही आहे, तर पर्यावरणवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचा या ठिकाणी कार डेपो उभारण्यास विरोध आहे. सध्या या डेपोचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएआरसी आरे ते बीकेसी या मार्गावर येत्या डिसेंबरपर्यंत तर संपूर्ण प्रस्तावित मार्गावर जून २०२४ पर्यंत मेट्रो सेवा सुरू करू इच्छित आहे. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने एमएमआरसीला न्यायालयीन आदेश झुगारून परवानगीपेक्षा अधिक झाडे तोडल्याप्रकरणी १० लाख रुपये दंड ठोठावला होता.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?