मुंबई

२० लाखांना महिलेला गंडा घालणाऱ्या आरोपीस अटक

Swapnil S

मुंबई : सुमारे २० लाखांना महिलेला गंडा घालणाऱ्या मित्राला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. समीर खान ऊर्फ रवी धीरज पोपट ऊर्फ समीर मर्चंट असे या आरोपी मित्राचे नाव असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत पोलिसांनी शहजाद अस्लम मलिक याला अटक केली होती. या दोघांनी तक्रारदार महिलेकडून साडेचार लाखांची कॅश आणि साडेपंधरा हजाराचे सोन्याचे दागिने घेऊन तिची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

४३ वर्षांची तक्रारदार महिला ही आग्रीपाडा परिसरात राहत असून, तिचा मोबाईल फोन रिचार्ज करण्याचा व्यवसाय अहो. तिची समीर आणि शहजाद यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांनी तिच्याशी जवळीक निर्माण करून तिचा विश्‍वास संपादन केला होता. व्यवसायासह विविध कारण सांगून तिच्याकडून साडेचार लाख रुपये घेतले होते. नंतर तिच्याकडून साडेपंधरा लाखांचे दागिने घेतले होते.

ते दागिने गहाण ठेवून पैसे घेणार असल्याचे सांगितले; मात्र दिलेल्या मुदतीत पैसे आणि दागिने न देता तिची फसवणूक केली होती. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांत गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या शहजादला २ नोव्हेंबरला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी समीरचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना त्याला तीन दिवसांपूर्वी वरळी येथून पोलिसांनी अटक केली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस