मुंबई

पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या आरोपीस अटक

Swapnil S

मुंबई : पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या विराज रघुनाथ पवार या तरुणाला पार्कसाइट पोलिसांनी अटक केली. बेडीने पोलीस शिपायावर हल्ला करून दुखापत केल्याने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्याच्याविरुद्ध मारहाण करून शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी २२ फेब्रुवारीला रात्री सव्वाअकरा वाजता घाटकोपर येथील अमृतनगर रोड, आरसीटी मॉलजवळ एक तरुण मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याची माहिती पार्कसाईट पोलिसांना मिळाली होती. विराज पवार याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यावर तो पोलीस ठाण्यात धिंगाणा घालू लागला होता. त्यामुळे त्याच्या हातात बेडी घालण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. यावेळी त्याने त्याच बेडीने पोलिसांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलीस शिपाई बालाजी डोईफोडे यांना दुखापत झाली होती. या प्रकारानंतर अखेर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

"एकनाथ शिंदेंना अपमानित करायचं नव्हतं..." देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, तब्बल १०७ कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त, राजस्थानमधील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश

ज्याला देव मानलं त्यानंच केला घात... नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला बलात्कार

लॉटरीच की! फक्त ९ हजारात मिळतोय सॅमसंगचा 'हा' 5G स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहे फीचर्स?