मुंबई

मुंबईच्या इमारतीवरही ट्विन टॉवर सारखी कारवाई, हायकोर्टाचा इशारा

याप्रकरणी मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्या नेतृत्वातल्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली.

उर्वी महाजनी

नोर्डामधील भ्रष्टाचाराची इमारत असलेल्या ट्विन टॉवरला उध्वस्त करून अजून आठवडाही झालेला नाही. त्यातच मुंबईतल्या खारमधील बिल्डर बाबत मुंबई हायकोर्टाने इशारा दिला आहे. खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या एका जमिनीला लागून असलेल्या एका जागेवर सुप्रीम कोर्टाने बांधकाम करायला स्टे दिला. पण तरीही बिल्डर कडून बांधकाम सुरू ठेवण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणी वेळी हाय कोर्टाने तुम्हाला ही ट्विन टॉवर सारख्या कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला.

याप्रकरणी मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्या नेतृत्वातल्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. दिलीप व्ही सप्तर्षी आणि दोन इतर रहिवाश्यानी जनहित याचिका दाखल केली होती. 1992 सालच्या विकास योजनेनुसार खारमधल्या एका जमिनीला खेळाचे मैदान करण्याचे योजना आखण्यात आली. यावर सुप्रीम कोर्टाच्या 1995 च्या आदेशानंतरच ते देण्यात आला. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणने या जमिनीवर एका रियालिटी प्रोजेक्ट ला मान्यता दिली. जनहित याचिकेमध्ये दावा करण्यात आला की, 2019 मध्ये एस आर ए प्रोजेक्ट निर्माण करताना या जमिनीवर पुन्हा एकदा बांधकामाला सुरुवात केली. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू केले त्याची पाहणी करा आणि त्यानंतर उपलब्ध असलेल्या मोकळ्या जमिनीच्या सीमेबाबत रिपोर्ट द्या असे मागच्या आठवड्यात हायकोर्टाने आर्किटेक ला सांगितले होत. एस आर ए बिल्डरने भूखंडावर बांधकाम केल्यामुळे खेळाचे मैदान 5255 वर्ग मीटर कमी झाले. खंडपीठाने सांगितल्यानंतर आर्किटेक ने याबाबतचा अहवाल जमा केला होता.

आर्किटेक ने सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर आता कोर्टाने पक्षकारांना जमिनीच्या रजिस्ट्री सोबत 20 सप्टेंबरला सुनावणीसाठी बोलावले आहे. बिल्डरची बाजू मांडणी अधिवक्ता रामा सुब्रामण्यन यांनी सीमांकन पूर्ण होईपर्यंत बांधकामावर घालण्यात आलेली बंदी उठवावी, अशी मागणी केली. यामध्ये फारसा रस घेतला नाही थोडा वेळ वाट बघू तुम्हालाही सुपर टेकसारख्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे खडे बोल सुनावणी दरम्यान हायकोर्टाने केले.

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस; पुढील तीन तास महत्त्वाचे, हवामान खात्याचा रेड अलर्ट

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; बीड, सिल्लोडमध्ये नागरिक अडकले, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य सुरू | Video

Mumbai : भरपावसात मोनोरेल पुन्हा बंद; प्रवाशांची सुखरूप सुटका, महिन्याभरातील दुसरी घटना

Waqf Board Amendment Act 2025 : वक्फ बोर्डातील दोन तरतुदींवर स्थगिती, पण संपूर्ण कायदा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

डाॅक्टरांचा गुरुवारी संप; सरकारच्या नवीन अधिसूचनेविरुद्ध IMAचा इशारा