मुंबई

प्राणीसंग्रहालय प्रकल्पाकडे सल्लागाराची पाठ प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा ;नाहूरमध्ये प्राणीसंग्रहालय उभारणीची चाचपणी

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुलुंडजवळील नाहूर गावात पालिकेच्या जमिनीवर प्राणीसंग्रहालय उभारण्यासाठी ३ नोव्हेंबर रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र निविदा प्रक्रियेला प्रकल्प सल्लागारांनी प्रतिसाद न दिल्याने मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा नव्याने निविदा मागवल्या आहेत. दरम्यान, यासाठी ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पूर्व उपनगरात मिनी प्राणीसंग्रहालय उभारण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. राणीबाग प्राणीसंग्रहालयात देशविदेशातील पशुपक्ष्यांचा किलबिलाट धमाल मस्ती अनुभवण्यासाठी राणीबागेत दररोज १५ ते १६ हजार पर्यटक भेट देतात. या पक्षी संग्रहालयाचा विस्तार राणी बागेतच केला जाणार आहे. राणी बागेला लागूनच असलेल्या मफतलाल मिलचा सुमारे दहा एकरचा भूखंड पालिकेला मिळाला आहे. या जागेत आधुनिक पद्धतीचे पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली आहे. प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर पक्षीगृहाच्या कामाला गती मिळणार आहे.

राणीबागेत मफतलाल मिलच्या जागेवर आणखी एक पक्षीगृह बांधले जाणार असताना नाहूर गावात अजून एक पक्षीगृह उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नाहूर गावात नगर भूमापन क्रमांक ७०६ आणि ७१२ हे सहा हजार चौरस मीटरचे पालिकेच्या मालकीचे भूखंड आहेत. त्यावर हे पक्षीगृह प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी सार्वजनिक सुविधांसह पक्षीगृहाचा आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली आहे.

यासाठी हवा सल्लागार

सल्लागाराकडून पक्षीगृहाचे संकल्पचित्र, आरेखन आणि बांधकामादरम्यान देखरेख याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस