मुंबई

शिवसेनेपाठोपाठ भाजपचेही मुंबईवर लक्ष! २२७ प्रभाग पिंजून काढणार; राजकीय स्थितीचा आढावा घेणार

लोकसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपला मुंबईत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई

लोकसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपला मुंबईत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईतील ३६ मतदार संघात भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नजर असणार आहे. मुंबईतील २२७ प्रभागात राजकीय स्थितीचा आढावा घेत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजुने मतदार राजाचा कौल काय या सगळ्या स्थितीचा डेटा कलेक्ट करण्यासाठी १२५ पदाधिकाऱ्यांची निवड मुंबई मतदारसंघासाठी केल्याचे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महायुती, महाविकास आघाडी असो, प्रत्येक राजकीय पक्षाने मुंबईतील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी रणनीती आखली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील ३६ मतदारसंघांतील २५ जागांवर उमेदवार उभे करण्याची हालचाल सुरू केली आहे. तर काँग्रेसने ३६ मतदार संघातील १६ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ११३ विधानसभा मतदारसंघातील ४६- विधानसभा प्रभारी व ९३- विधानसभा निरिक्षक पद नियुक्त्या अधिकृतरीत्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे भाजपनेही मुंबईकडे मोर्चा वळवला असून २२७ प्रभाग पिंजून काढण्यासाठी १२५ वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. हे पदाधिकारी प्रत्येक प्रभागाला भेट देत एक पदाधिकारी एक ते तीन प्रभागातील राजकीय परिस्थिती आढावा घेणार असल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

यावर पदाधिकाऱ्यांचे लक्ष!

लोकसभा निवडणुकीत जी निराशा पदरी पडली ती विधानसभा निवडणुकीत पडू नये यासाठी भाजपने अंतर्गत पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. मतदारराजाचा कौल, पक्षाची तेथील राजकीय स्थिती, विद्यमान उमेदवार की नवीन उमेदवार द्यायचा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत त्याठिकाणी काय स्थिती याचा सगळा आढावा १२५ पदाधिकारी घेणार असल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

Maharashtra Heavy Rain : ठाणे, रायगडसाठी 'रेड अलर्ट'

तमिळ अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३३ जणांचा मृत्यू; ५० जखमी

आजचे राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत