मुंबई

मुंबई महापालिका 'अलर्ट मोड'वर ; चौपाट्यांवर पूर बचाव पथक, पोलिसांची मोबाईल व्हॅन तैनात

नवशक्ती Web Desk

अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झल्यामुळे हवामान खात्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका 'अलर्ट मोड'वर असून, चौपाट्यांवर पूर बचाव पथक, मोबाईल व्हॅन तैनात करण्यात येणार आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून, या कालावधीत पर्यटक-नागरिकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा अलर्ट झाली आहे. समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने वारे मुंबई-कोकणच्या दिशेने पुढे सरकत आहेत. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी याबाबत बैठक पार पडली. त्यात संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने सरकत असले, तरी मुंबई आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका अधिक आहे. यासाठी वॉर्डस्तरावर सज्जता ठेवली असून, समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांना माहिती देणे, भरती ओहोटीची माहिती देणारे फलक लावणे, विभागात पालिका शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सज्जता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नौदल, पटरक्षक दल सज्ज

अग्निशमन दलाकडून सहा प्रमुख चौपाट्यांवर पूर बचाव पथके तैनात करण्यात येणार आहेत, तर नागरिकांना चौपाट्यांवर जाण्यास मज्जाव करण्यात येणार असून, आवश्यकता भासल्यास नौदल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची मदत घेण्यासाठी समन्वय साधण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

चक्रीवादळ इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. काय करावे आणि काय करू नये, याबाबतच्या सूचना मुंबईकरांना देण्यात येणार आहेत, तरी कुणीही अफवा पसरवू नयेत आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस