मुंबई

मुंबईकरांचा वातानुकूलित डबल डेकरचा 'बेस्ट'प्रवास

एकूण ५४ आसन क्षमता असलेल्या ९०० डबल डेकर बसेस दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात २२५ बसेस डिसेंबर अखेरपर्यंत दाखल होणार आहेत

प्रतिनिधी

अखेर वातानुकूलित डबल डेकर बसेस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत गुरुवारी यशवंतराव चव्हाण केंद्रात सायंकाळी ६.३० वाजता डबल डेकर बस सुपूर्द करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, एकूण ५४ आसन क्षमता असलेल्या ९०० डबल डेकर बसेस दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात २२५ बसेस डिसेंबर अखेरपर्यंत दाखल होणार आहेत. त्यामुळे बेस्ट प्रवाशांचा प्रवास गारेगार व आरामदायी होणार आहे. डबल डेकर बसेस मुंबईची शान असून सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ७० डबल डेकर बसेस आहेत. मात्र या बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने नवीन ९०० वातानुकूलित डबल डेकर बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २०० बसेस दाखल होणार असून अशोक लेलॅड कंपनीच्या या बसेस आहेत.

दोन्ही बाजूला प्रवेशद्वार

लंडनमधील डबलडेकर बसच्या धर्तीवर ही बस बेस्टच्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बस कशी असणार कधी दाखल होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अशा प्रकारची बस आता दाखल होणार आहे. इलेक्ट्रिक बस या पर्यावरणपूरक असल्याच्या दावा केला जातो. त्या धाटणीत तयार केलेली पहिली वहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस बेस्टच्या ताफ्यात सामील होणार आहे. डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बसमध्ये दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा मिळणार आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हीची सुविधा देण्यात आली आहे. बेस्टच्या ताफ्यात डिसेंबरअखेरीपर्यंत २२५, मार्च २०२३ पर्यंत २२५ आणि जून २०२३ पर्यंत उर्वरित ४५० बस बेस्ट ताफ्यात येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन