प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

बॉम्बच्या धमकीमुळे एअर इंडियाचे विमान पुन्हा मुंबईत उतरविले; शौचालयात धमकीची चिठ्ठी

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी असलेली चिठ्ठी शौचालयात मिळाल्यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी घडला.

Swapnil S

मुंबई : मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी असलेली चिठ्ठी शौचालयात मिळाल्यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी घडला. या विमानामध्ये ३२० हून अधिक प्रवासी होते. सदर विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरविण्यात आले आणि सुरक्षा यंत्रणांकडून त्याची तपासणी करण्यात आली.

मुंबई - न्यूयॉर्क विमान प्रवासादरम्यान ‘एआय-११९’ विमानात सोमवारी धमकीची चिठ्ठी आढळली. यानंतर विमानातील प्रवाशांची सुरक्षा विचारात घेत आवश्यक प्रोटोकॉलनुसार विमान परत मुंबईला वळवण्यात आले, अशी माहिती एअर इंडियाच्या निवेदनात देण्यात आली आहे. विमानाच्या शौचालयात बॉम्बने उडवून देण्याची धमकी असलेली चिठ्ठी आढळून आली. या विमानात १९ कर्मचाऱ्यांसह ३२२ प्रवासी होते. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमान मुंबई येथे सकाळी १०.२५ वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

या घटनेनंतर विमानाच्या पुढील उड्डाणाची वेळ बदलण्यात आली आहे. आता मंगळवार, ११ मार्च रोजी सकाळी ५ वाजता हे विमान पुन्हा उड्डाण करेल. तोपर्यंत सर्व प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे एअरलाइन्सने सांगितले.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चे ब्राह्मणीकत्व

दिवाळीऐवजी दिवाळं निघालं...

आजचे राशिभविष्य, २० ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Diwali 2025 : दिवाळीत मातीचे दिवे लावण्यामागचा खरा अर्थ माहितीये?