मुंबई

सरकारमधील खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर उपमुख्यमंत्र्यांकडे गृह व अर्थ खाते असण्याची शक्यता

प्रतिनिधी

मंत्रिमंडळ विस्‍तारानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधील खातेवाटप काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्‍वतःकडे आधीचेच नगरविकास हे खाते ठेवतील, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ ही दोन अतिशय महत्त्वाची खाती जातील, अशी शक्‍यता आहे.

भाजपचेच ज्‍येष्‍ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ऊर्जा आणि वन ही खाती जाण्याची शक्‍यता आहे. विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास, गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खात्‍याचा कारभार जाण्याची शक्‍यता आहे. रवींद्र चव्हाण यांना गृहनिर्माण, अतुल सावे यांना आरोग्‍य, तर सुरेश खाडे यांच्याकडे सामाजिक न्याय खात्‍याची धुरा सोपविण्यात येऊ शकते. मंगलप्रभात लोढा यांना विधी व न्याय खात्‍याची जबाबदारी देण्यात येऊ शकते. शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा, दादा भुसे यांच्याकडे कृषी, संजय राठोड ग्रामविकास, संदीपान भुमरे रोजगार हमी, उदय सामंत यांना उद्योग, तानाजी सावंत यांना शालेय शिक्षण तथा उच्च व तंत्रशिक्षण, अब्‍दुल सत्‍तार यांना अल्‍पसंख्याक विकास, दीपक केसरकर यांना पर्यटन आणि पर्यावरण, शंभुराज देसाई यांना उत्‍पादन शुल्‍क खात्याची जबाबदारी देण्यात येऊ शकते.

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?

काय सांगता! Bajajनं आणली चक्क CNG BIKE, 'या' दिवशी होणार लॉन्च