मुंबई

आदित्य ठाकरे यांच्या नावाने कुस्तीपटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न

या ठगाविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीच्या प्रयत्नासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली

प्रतिनिधी

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या नावाने सोशल मीडियावर फसवणूक प्रयत्नाचा प्रकार उघडकीस आल्याची घटना ताजी असताना आता शिवसेनेचे युवा नेते आणि आमदार आदित्य उद्धव ठाकरे यांच्या नावाने एका व्यावसायिक कुस्तीपटूची अज्ञात सायबर ठगाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी या ठगाविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीच्या प्रयत्नासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांत सायबर सेलचे अधिकारीही संमातर तपास करीत आहेत. या ठगाने तो आदित्य ठाकरे असल्याचे सांगून या तरुणाकडून २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत