मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी पुलावर (सहार उड्डाणपूल) रविवारी सकाळी एक टेम्पो उलटल्याने मोठी वाहतूककोंडी झाली. यामुळे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. सोमवारी ऐन कार्यालयीन वेळेत घडलेल्या या घटनेमुळे हजारो प्रवासी काही तास अडकून पडले. वाहतूक अधिकाऱ्यांच्या प्रयत्नानंतर अखेर पाच तासांनी वाहतूक पूर्ववत झाली. अपघातानंतर जायबंदी वाहनांना बाजुला करण्याची कसरत पोलिसांना करावी लागली.
अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
पत्रकार विवेक गुप्ता यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अपघातानंतर नुकसान झालेले वाहने दाखवण्यात आली आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात अंधेरी पुलाजवळ झाला. एका टेम्पोने नियंत्रण गमावल्यानंतर अनेक वाहनांना धडक दिली आणि उलटली. परिणामी महामार्गावरील अनेक मार्गिका ठप्प पडल्या. यानंतर दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहने रांगेत अडकली होती. या व्यत्ययामुळे मुंबईकरांना मोठ्या विलंबाला सामोरे जावे लागले.
अपघातात जखमी नाही
अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही दोन्ही अपघातात कोणीही जखमी झाले नाही. तथापि, उलटलेल्या टेम्पो आणि काही खासगी कारसह ४-५ वाहनांचे अपघातात नुकसान झाले. स्थिती पूर्ववततेसाठी नुकसान झालेल्या वाहनांना बाजूला करण्यासाठी आपत्कालीन सेवा आणि वाहतूक कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले. कामगारांनी क्रेनचा वापर करून उलटलेला टेम्पो उचलला आणि रस्त्यावरून अडथळा दूर करत वाहतूक पूर्ववत केली.