मुंबई

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणीसंग्रहालयात पर्यटकांकडून प्राण्यांना त्रास

शेफाली परब-पंडित

भायखळाच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणीसंग्रहालयात पर्यटकांकडून प्राण्यांना त्रास देण्याचा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उद्यान प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. प्राणीसंग्रहालयात आता कायमस्वरूपी अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच पिंजऱ्यावर वायरची जाळी बसवली जाणार आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे आणि कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे प्राणीसंग्रहालयात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मागील दोन-तीन वर्षांत भायखळा प्राणीसंग्रहालयाने अनेक नवीन प्राणी आणले आहेत. पेंग्विनशिवाय बंगाली टायगर आणि बर्ड्स पॅराडाईज हे लहान मुलांसाठी मुख्य आकर्षण बनले आहेत. मंगळवारी रमजान ईदच्या दिवशी तर १६ हजार पर्यटकांची नोंद झाली. एका माकडाच्या पिंजऱ्याबाहेर मुलांच्या एका गटाने उपद्रव माजवला. त्यांनी पिंजऱ्यात अन्न टाकण्याबरोबरच माकडाला मारहाण करण्याचाही प्रकार केला. याचा व्हिडीओ बनवून व्हायरल झाल्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्राणीसंग्रहालयात १६ माकडे असून त्यांना दररोज फळे आणि भाज्या पुरवल्या जातात. पर्यटकांनी पिंजऱ्यातील प्राण्यांना बाहेरचे अन्न देऊ नये अशा सक्त सूचना आहेत. पण तरीही लोक अन्न टाकून जनावरांना त्रास देत असल्याचे निदर्शनास येत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी बैठक बोलावून उपाययोजनांचा निर्णय घेण्यात आला.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत