संग्रहित छायाचित्र ANI
मुंबई

अंजना कृष्णा धमकी प्रकरणात बावनकुळे यांचे अजितदादांना समर्थन

महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका होत असताना महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे समर्थन केले आहे. पवारांचा संबंधित अधिकाऱ्याला केलेला फोन चुकीच्या अर्थाने घेतला जात असल्याचे शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले.

Swapnil S

मुंबई : महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका होत असताना महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे समर्थन केले आहे. पवारांचा संबंधित अधिकाऱ्याला केलेला फोन चुकीच्या अर्थाने घेतला जात असल्याचे शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले.

आपल्याला अनेकदा नेमके काय चाललेय हे माहीत नसते. कधी अधिकाऱ्यांचे म्हणणे असते की काम बेकायदेशीर आहे, तर कार्यकर्ते म्हणतात की ते कायदेशीर आहे. अशा प्रकारे वाद निर्माण होतो. अजित पवार हे कधीही कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी झापतील असे मला वाटत नाही. मला वाटते की त्यांनी फक्त पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून फोन केला असावा, आणि त्यांना हे माहीत नसेल की तो खाणकाम बेकायदेशीर आहे, असे बावनकुळे म्हणाले.

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर; करारानंतर दोन वर्षांनंतर मिळणार डबे

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

खग्रास चंद्रग्रहणाचा रंगला अनोखा सोहळा