अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरण : निलंबित काझीचा अर्ज फेटाळला छायाचित्र सौ. FPJ
मुंबई

अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरण : निलंबित काझीचा अर्ज फेटाळला

मुंबई : अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस अधिकारी रियाजुद्दीन काझीला मोठा झटका दिला. या प्रकरणात दोषमुक्त करण्याची काझीने केलेली विनंती, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी फेटाळून लावली. काझीने पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझेला मदत केल्याचे प्राथमिक पुरावे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Swapnil S

मुंबई : अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस अधिकारी रियाजुद्दीन काझीला मोठा झटका दिला. या प्रकरणात दोषमुक्त करण्याची काझीने केलेली विनंती, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी फेटाळून लावली. काझीने पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझेला मदत केल्याचे प्राथमिक पुरावे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील इतर नऊ आरोपींबरोबरच काझीला २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. एनआयएने काझीवर गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गंभीर आरोप लावले आहेत. जामिनावर असलेल्या काझीने या प्रकरणाचा तपास अधिकारी असलेल्या वाझेच्या आदेशांचे पालन केल्याच्या कारणावरून सुटका मागितली होती.

त्यावेळी सहाय्यक निरीक्षक असलेल्या काझीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने वाझेच्या सांगण्यावरून वाझेच्या गृहनिर्माण संस्थेचे डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर जप्त केले होते, असा एनआयएचा दावा आहे. पुरावे गायब करण्यासाठी काझीने सचिन वाझेच्या सांगण्यावरून पुरावे नष्ट करण्यासाठी डीव्हीआर, सीपीयू इत्यादी गोळा केले. यामाध्यमातून काझीने यूएपी कायद्यांतर्गत गुन्हा करण्यास मदत केल्याचे दिसते, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी काझीचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळूल लावला.

केंद्रीय तपास यंत्रणेची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील सुनील घोन्साल्विस यांनी काझीच्या अर्जाला तीव्र विरोध केला

होता. काझीचा पुरावे नष्ट करण्यात सहभाग असल्याचे विविध साक्षीदारांच्या जबाबात स्पष्ट झाल्याचे घोन्साल्विस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या