मुंबई

घनकचरा व्यवस्थापनावर आता अॅपची नजर आराखडा, लोकसहभाग वाढवण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोजची स्वच्छता, मनुष्यबळ एकूण घनकचरा यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी अॅप विकसित करत आराखडा तयार करा, असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. तसेच स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने व्यापक अभियान राबवावे, असे निर्देश डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत.

मुंबईतील दैनंदिन स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन याबाबतचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत वेगवेगळ्या बाबींवर सविस्तर चर्चा करून संबंधितांना विविध निर्देश दिले. यावेळी उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पळणीटकर, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विविध सार्वजनिक परिसरांत नुकत्याच भेटी देऊन स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली होती. तसेच स्वच्छता व कचरा व्यवस्थापनामध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाला सूचना त्यांनी केल्या आहेत.

सार्वजनिक आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता हे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे व महत्त्वाचे विषय असतात. विशेषतः स्वच्छता ही आरोग्य जपणुकीसाठी प्राधान्याची असते. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जा असून त्याला साजेशी सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनामध्ये आता आमूलाग्र बदल होणे गरजेचे असून त्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात यावा. लोकसहभागाशिवाय स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही, त्यामुळे स्वच्छतेच्या सवयींमध्ये नागरी शिस्त व सहभाग वाढवण्यासाठी व्यापक व दीर्घकालीन जनजागृती अभियान हाती घ्यावे. कचरा वर्गीकरण, दैनंदिन कार्यपद्धतीमध्ये सुधारणा इत्यादी विषयांवर कनिष्ठ अवेक्षक यांचे प्रशिक्षण घ्यावे, प्रगत परिसर व्यवस्थापन, रहिवासी कल्याण संघटना यांसारख्या संकल्पनांना अधिक बळ द्यावे, असे निर्देश शिंदे यांनी दिले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस