मुंबई

चोरी, लुटमार करणाऱ्यांची धरपकड: तीन दिवसांत ५ जणांना अटक; मध्य रेल्वे आरपीएफची कारवाई

Swapnil S

मुंबई : रेल्वे परिसर, स्थानक परिसरात चोरी लुटमार करणाऱ्या विरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या तीन दिवसांत चोरी लुटमार करणाऱ्या ५ जणांना अटक केली आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेच्या आवारात चोरी आणि लुटमारीच्या घटनांविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली आहे. १४ फेब्रुवारी रोजी वडाळा रोडवरून कुर्ल्याकडे एका संशयित व्यक्तीचा पाठलाग केला आणि तो ट्रेनमधून खाली उतरला आणि पळून जाऊ लागला. त्यावेळी त्याला कुर्ला स्थानकावर पकडण्यात आले. रिझवान शेख नावाच्या आरोपीने चौकशीत प्रवाशाकडून मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून २२,९९९ किमतीचा ओप्पो मोबाईल जप्त करण्यात आला. तर अंबरनाथ स्थानकातून ठाणे येथे जाणाऱ्या ट्रेनमधून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पकडले. दिपक वाघरी आरोपीने चौकशीत ट्रेनमधील प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून २ रिअलमी मोबाईल जप्त करण्यात आले. कल्याण स्थानकावरील आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांनी, कल्याण स्थानकाच्या परिसरात संशयास्पद फिरत असलेल्या व्यक्तीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. दशरथ ठाकूर नावाच्या आरोपीने चौकशीत कल्याण स्थानकात प्रवाशांचे मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून ३१,८०० रुपये किमतीचे २ सॅमसंग मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

भुसावळ स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांना स्थानकाच्या परिसरात एक व्यक्ती संशयास्पद रीतीने फिरताना दिसली. कृष्णा सावंत नावाच्या आरोपीने चौकशीत सचखंड एक्स्प्रेसमधील प्रवाशाकडून मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून एक विवो मोबाईल फोन जप्त करण्यात आला. भुसावळ स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांनी, एका प्रवाशाने दिलेल्या माहितीवर कारवाई करत, स्थानकाच्या परिसरात संशयास्पद रीतीने फिरत असलेल्या एका व्यक्तीला पकडले. चौकशीत समीर पठाण नावाच्या आरोपीने अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात झोपलेल्या प्रवाशाकडून मोबाईल चोरल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून एक विवो मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

३७९ अन्वये खटला दाखल!

सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अन्वये खटला चालवण्यासाठी संबंधित अधिकार क्षेत्रातील शासकीय रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस