मुंबई

आशीष शर्मा यांचा प्रशासकीय सेवेचा अनुभव मुंबई महापालिकेतील कामकाजात उपयुक्त ठरणार

प्रतिनिधी

अतिरिक्त आयुक्त म्हणून आशीष शर्मा यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. केंद्र सरकारमध्ये शर्मा यांनी विविध पदावर काम केले आहे. त्यामुळे शर्मा यांच्या प्रशासकीय सेवेचा दाडंगा अनुभव मुंबई महापालिकेतील कामकाजात उपयुक्त ठरणार आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत यांनी शर्मा यांचे स्वागत केले.

शर्मा हे भारतीय प्रशासन सेवेतील १९९७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. आयआयटी दिल्लीमधून ‘बीटेक’ पदवी संपादित केल्यानंतर त्यांनी ‘मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस’ (पंजाब विद्यापीठ, चंदीगड) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तर प्रशासकीय सेवेत आल्यानंतर ‘एमएस्सी इन पब्लिक पॉलिसी अँड अॅडमिनिस्ट्रेशन’ ही पदव्युत्तर पदवीदेखील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून (ब्रिटन) २००६-२००७ मध्ये संपादित केली आहे.

शर्मा यांना प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिमचे जिल्हाधिकारी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, केंद्रीय अपारंपरिक उर्जामंत्र्यांचे खासगी सचिव, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे महाराष्ट्र राज्य आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य विद्युतनिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे सहसचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य सचिव (वित्त), कार्मिक एवं प्रशिक्षण विभागाचे सहसचिव या पदांवर सेवा बजावली आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण