Mumbai : राणी बागेत लवकरच सिंहांची जोडी येणार; गुजरात सरकारची मंजुरी 
मुंबई

Mumbai : राणी बागेत लवकरच सिंहांची जोडी येणार; गुजरात सरकारची मंजुरी

चार ते पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान वनस्पती व प्राणी संग्रहालयात आशियाई सिंहाची जोडी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत गुजरात सरकारने मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : चार ते पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान वनस्पती व प्राणी संग्रहालयात आशियाई सिंहाची जोडी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत गुजरात सरकारने मंजुरी दिली आहे.

सिंहांच्या जोडीच्या बदल्यात राणी बागेतील कुठले प्राणी-पक्षी द्यायचे हे लवकरच निश्चित होईल. राणी बागेत सिंहांची जोडी यावी यासाठी गुजरातच्या वनमंत्र्याना मार्च २०२६ मध्ये पत्र लिहिले होते. आता गुजरात सरकारने मंजुरी दिल्याने लवकरच मुंबईकर पर्यटकांना गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील सिंहाच्या जोडीची धमाल मस्ती अनुभवता येणार आहे, असा विश्वास महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय पर्यटकांचे आकर्षण. पालिकेच्या या उद्यान व प्राणी संग्रहालयात २१ पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. याशिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चेकंपनीसह मोठ्यांचेही राणी बाग आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. परंतु, राणी बागेत सिंहांची गर्जना कधी होणार याची चार ते पाच वर्षांपासून प्रतीक्षा आहे.

जिमी सिंहीणीचा २०१४ मध्ये मृत्यू

आता राणी बागेतील प्राणीसंग्रहालयात गुजरातच्या सिंहांची डरकाळी कानी पडणार आहे. राणी बागेत जिमी ही शेवटची सिंहीण होती. २०१४ मध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सिंह आणण्यासाठी प्रयत्न झाले नाही.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प : साबरमती नदीवरील पुलाचे काम पूर्ण; गुजरातमधील २१ नदी पुलांपैकी १८ पुलांची बांधणी पूर्ण

नायरा एनर्जीचे पेट्रोल-डिझेल महागले

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

गोरेगाव शौचालयात वायू गळती मृत्यू प्रकरण : इलेक्ट्रोप्लेटिंग कंपनीच्या मालकाला उत्तर प्रदेशातून अटक

आता संकट चारा टंचाईचे; नाशिक जिल्ह्यात चार महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक