मुंबई

फूटपाथवर झोपण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला ;आरोपीला जामीन

नवशक्ती Web Desk

मुंबई : फुटपाथवर झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला सत्र न्यायालयाने दिलासा दिला. न्यायाधीश डॉ. एस. डी. तवशीकर यांनी आरोपी दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असून आणखी दोन-तीन वर्षे तरी खटला पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट करत आरोपीची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

मुलुंड पश्चिमेकडील एन. एस. रोडवर २८ जुलै २०२१ रोजी मध्यरात्री अंबरनाथ येथील रहिवासी असलेला आरोपी सूरज तेवर आणि तक्रारदार यांच्यात झोपण्याच्या जागेवरून किरकोळ वाद झाला. त्या रागातून सूरजने तक्रारदारावर पेव्हर ब्लॉकच्या मदतीने हल्ला केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. पोलिसांनी सूरजला तत्काळ अटक केली.

अटकेत असलेल्या सूरजच्या वतीने अ‍ॅड. गणेश नागरगोजे यांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. त्या अर्जावर न्यायाधीश डॉ. एस. डी. तवशीकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाचे आरोप अ‍ॅड. नागराज यांनी फेटाळून लावले. तक्रारदार स्वत:च दारूच्या नशेत होता. तसेच कथित हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेज अद्याप न्यायालयासमोर सादर करण्यात आले नाही, अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही सरकारी पक्षाकडे नाही. अशा परिस्थितीत आरोपीला दीर्घकाळ तुरुंगात डांबणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. नागरगोजे यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायाधीश तवशीकर यांनी ३१ वर्षीय सूरजला १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याचा सशर्त जामीन तंजूर केला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस