प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

अटल सेतू प्रकल्पबाधित मच्छीमारांना दिलासा; एका महिन्यात सर्व्हे करत अहवाल सादर करण्याचे निर्देश

न्हावा-शिवडी अटल सेतू प्रकल्पबाधित, वंचित मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी एका महिन्यात सर्वे करत अहवाल सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : न्हावा-शिवडी अटल सेतू प्रकल्पबाधित, वंचित मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी एका महिन्यात सर्वे करत अहवाल सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. शासनाने २०१९ पर्यंतची डेड लाईन दिली होती. मात्र त्यानंतरही पाणजे, घारापुरी ही गावे नुकसान भरपाईपासून वंचित राहिली आहेत. प्रकल्पबाधित मच्छीमारांना न्याय देण्यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेत वंचित राहिलेल्या गावांसह अहवाल सादर करण्याचे निर्देश बनसोडे यांनी दिले आहेत.

न्हावा-शिवडी अटल सेतू प्रकल्पबाधित मच्छीमारांच्या नुकसान भरपाई बाबत विधानभवनात उपाध्यक्षांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत मत्सव्यवसाय, पदुम व एमएमआरडीए विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; २४ नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...

मोठी बातमी! १७ मुलांना ओलिस ठेवणारा आरोपी पोलिस चकमकीत ठार; नेमकं काय घडलं?

Mumbai : ऑडिशनच्या बहाण्याने १७ अल्पवयीन मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण; अखेर १ तासाच्या थरार नाट्यानंतर मुलांची सुटका, आरोपी ताब्यात

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाची कारणे दाखवा नोटिस; उत्तर न दिल्यास होणार कारवाई