मुंबई

शिकवणीला आलेल्या दोन अल्पवयीन मुलांवर हल्ला, भायखळा येथील घटना; आरोपीस अटक व कोठडी

एका सोसायटीमध्ये क्लाससाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नऊ आणि दहा वर्षांच्या दोन्ही मुलांना किरकोळ दुखापत झाली.

Swapnil S

मुंबई : एका सोसायटीमध्ये क्लाससाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नऊ आणि दहा वर्षांच्या दोन्ही मुलांना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच लेबन्ता जयराम पटेल असे या आरोपीला भायखळा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तक्रारदार महिला ही भायखळा येथे राहत असून खासगी शिकवणी घेते. शुक्रवारी सायंकाळी तिच्या घरी शिकवणी सुरू होती. याच दरम्यान तिथे एक तरुण आला आणि त्याने क्लासमध्ये आलेल्या दोन्ही मुलांवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याने घरातील सर्व सामानाची नासधूस करून तोडफोड केली. स्वयंपाकघरात जाऊन गॅस सुरू करून घराला आग लावण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर या महिलेसह दोन्ही मुलांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी तिथे धाव घेऊन तरुणाला ताब्यात घेतले.

याबाबत माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाला ताब्यात घेतल्यांनतर हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही मुलांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी