मुंबई

वाहनांच्या किरकोळ विक्रीत ऑगस्टमध्ये ८.३१ टक्के वाढ

वृत्तसंस्था

ऑगस्टमध्ये किरकोळ वाहन विक्रीत ८.३१ टक्के वाढ झाली आहे. ऑटोमोबाईल डीलर्सची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा)च्या मते, ऑगस्टमध्ये एकूण वाहन किरकोळ विक्री ऑगस्ट २०२१मध्ये १४,०४,७०४च्या तुलनेत १५,२१,४९० युनिट्सवर होती. याशिवाय, प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीची संख्या २,७४,४४८ होती. जी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २,५७,६७२ होती. म्हणजेच, प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत ६.५१ टक्के वाढ झाली आहे.

तीन चाकी वाहन विक्रीत ८३.१४ टक्क्यांची वाढ

यावर्षी ऑगस्टमध्ये दुचाकी वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक आधारावर ८.५२ टक्के वाढ झाली आहे. दुचाकी विभागातील किरकोळ विक्री १०,७४,२६६ युनिट्स एवढी होती. जी मागील वर्षी याच महिन्यात ९,८९,९६९ होती. तीन चाकी वाहन विक्री ऑगस्टमध्ये ८३.१४ टक्के वाढ झाली. तीनचाकी विभागात ५६,३१३ युनिट्सची विक्री झाली. जी गेल्या वर्षी याच महिन्यात ३०,७४८ युनिट्स होती.

ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक वाहन विभागामध्ये २४.१२ टक्के वाढ झाली. या महिन्यात ६७,१५८ युनिट्सची विक्री झाली. गेल्यावर्षी याच महिन्यात ५४,१०७ मोटारींची विक्री झाली होती.

फाडाचे अध्यक्ष मनीषराज सिंघानिया यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी आहे. जर आपण या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीची २०१९च्या ऑगस्ट महिन्याशी तुलना केली तर एकूण किरकोळ विक्रीत ७ टक्क्यांची घट झाली आहे. तर प्रवाशी वाहनांमध्ये ४१ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय, व्यावसायिक वाहनांमध्ये ६ टक्के वाढ दिसून आली. दुसरीकडे, दुचाकी, तीन चाकी आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत अनुक्रमे १६ टक्के, १ टक्के आणि ७ टक्क्यांची घट झाली आहे.

मध्य रेल्वेत ज्येष्ठांसाठी मालडबा खुला करा; हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

मराठा आरक्षणाचा वाद; राज्य सरकारला ‘तो’ अधिकार नाही - हाके

ठाणे स्थानकात उद्या रात्री ६ तासांचा पॉवर ब्लॉक, रात्री १०.३० ते पहाटे ४.३० पर्यंत गर्डर बसविण्याचे काम

सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनल हॅक; 'हे' Video केले अपलोड

जालन्यात एसटी बस-टेम्पोचा भीषण अपघात; बसच्या वाहकासह सहा जण ठार, १७ जखमी