मुंबई

बेस्ट उपक्रमाची आझादी योजना;१ रुपयात बस प्रवास करता येणार

प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असून केंद्र सरकारच्या सुचनेनुसार देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. बेस्ट उपक्रमानेही प्रवाशांसाठी एक रुपयांत बेस्ट आझादी योजना' उपलब्ध केली असून या योजने अंतर्गत चलो अॅपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा बसपास केवळ एक रुपयात डाऊनलोड करता येईल.

विशेष म्हणजे प्रवाशांना वातानुकूलित व विना वातानुकूलित बसमध्ये सात दिवसांत कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा लाभ घेता येणार आहे. ही सवलत १५ ऑगस्ट, २०२२ पर्यंत लागू राहील, असे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, बेस्ट उपक्रमाने सुरु केलेल्या चलो अॅपला २२ लाख प्रवाशांनी पसंती दिली आहे.

मुंबईकरांना जागतिक डिजिटल तिकीट प्रणालीचा अनुभव देणे ही, या पास योजनेमागील कल्पना आहे. डिजिटल बस योजनेला देखील सध्या वाढती मागणी आहे. बेस्टचा १०० हून अधिक डिजिटल बसेस मध्ये टॅप इन आणि टॅप आऊट प्रणाली कार्यान्वित आहे. आता तिकिटांसाठी रांगेत उभे राहावे लागत नसल्याने प्रवाश्यांना प्रवास करणे सोयीचे झाले आहे. तसेच ज्या लोकांना स्मार्ट कार्डस / एनसीएमसी कार्डचा वापर करावयाचा असेल अशा प्रवाशांना २० रुपयाची सवलत दिली जाते. ही सवलत देखील १५ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.

बेस्टच्या ताफ्यात पहिली

डबल डेकर इलेक्िट्रक बस

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच डबल डेकर इलेक्िट्रक बसेस दाखल होणार आहेत. बेस्टने ९०० डबल डेकर बसेस घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यापैकी प्रोटोटाईप बसेस पैकी एक बस बेस्टच्या ताफ्यात येत्या आठवड्याभरात दाखल होईल, असे समजते.

मुंबईत संथ मतदान का? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिले चौकशीचे आदेश

Pune Porsche crash: "पोलिसांवर दबाव आणला नाही, मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं स्पष्टीकरण

Maharashtra HSC 12th Result 2024: यंदाही मुलींचीच बाजी; कोकण विभाग अव्वल तर 'या' विभागाचा सर्वात कमी निकाल!

Mumbai: फ्लेमिंगोंच्या थव्याला विमानाची धडक, घाटकोपर परिसरात ३७ पक्ष्यांचा मृत्यू

गर्लफ्रेंडला कधीच सांगू नका 'या' ४ गोष्टी, नाहीतर...