संग्रहित छायाचित्र  
मुंबई

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपीला दणका; जामीन मंजूर करण्यास सत्र न्यायालयाचा नकार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी चेतन पारधीला सत्र न्यायालयाने झटका दिला. पारधीने जामिनासाठी विनंती केली होती. तथापि, त्याने गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून हल्लेखोरांना मदत केल्याचे स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पारधीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी चेतन पारधीला सत्र न्यायालयाने झटका दिला. पारधीने जामिनासाठी विनंती केली होती. तथापि, त्याने गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून हल्लेखोरांना मदत केल्याचे स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पारधीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

चेतन पारधीने बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांना मदत केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी पारधीला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ठाण्यातील छायाचित्रकार पारधीने हत्येत सहभागी दोन्ही शूटर्सना आश्रय दिल्याचा तसेच त्यांना शस्त्रांसाठी सराव जागा व लॉजिस्टिक सपोर्ट पुरवल्याचा आरोप आहे. त्याने जामिनासाठी विशेष मकोका न्यायालयात दाद मागितली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी त्याचा जामीन अर्ज धुडकावून लावला.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास