मुंबई

'संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम'; राऊतांच्या टीकेवर बच्चू कडूंचा संताप

प्रतिनिधी

शिंदे - फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्याला आनंद शिधा वाटप करण्याची घोषणा केली होती. पण, गुढीपाडवा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असतानाही अद्याप शिधा पोहोचलाच नसल्याची तक्रार अनेक ठिकाणांहून येत आहे. यावरून खासदार संजय राऊत म्हणाले की, "आनंदाचा शिधा लोकांना नाही, तर आमदारांना खोक्यात मिळतो," अशी टीका त्यांनी केली. यावरून बच्चू कडूंनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "संजय राऊतांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे," अशी खोचक टीका त्यांनी केली.

आमदार बच्चू कडू संजय राऊतांच्या टीकेवर म्हणाले की, "संजय राऊतांच्या स्वप्नात रोज खोकेच येतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, यावर उपचार करणे गरजेचे आहे." अशा शब्दात त्यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले की, "राज्यात कोणाचेही राज्य असलं तरीही गरिबांचे आयुष्य कडूच. आपल्या देशात एक वर्ग हा उपाशी झोपणारा आणि दुसरा तुपाशी खाणारा आहे. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी तुपाशी खाणाऱ्या लोकांची व्यवस्था केली. त्यामुळे गरिबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार विरोधाकांनाही नाही. सत्तेच्या बाहेर पडले की त्यांना उपाशी लोकांची आठवण येते आणि सत्तेत आल्यानंतर तुपाशी असलेल्या लोकांशी रोज भेटीगाठी करतात, त्यामधीलच हा प्रकार आहे,"

मतदान टक्केवारी जबाबदारी केवळ मतदारांची नाही!

अस्तित्वाच्या लढाईचा पहिला अंक समाप्त

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली