मुंबई

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर शोभिवंत फुलांचा बहर; पुण्यतिथीनिमित्त लाखो शिवसैनिक नतमस्तक होणार

महाराष्ट्राचे लाडके नेते आणि लाखो शिवसैनिकांचे दैवत हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची रविवार १७ नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी आहे. या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील बाळासाहेबांचे चाहते आणि शिवसैनिक दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील स्मृतीस्थळाला भेट देत नतमस्तक होतात.

Swapnil S

मुंबई: महाराष्ट्राचे लाडके नेते आणि लाखो शिवसैनिकांचे दैवत हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची रविवार १७ नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी आहे. या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील बाळासाहेबांचे चाहते आणि शिवसैनिक दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील स्मृतीस्थळाला भेट देत नतमस्तक होतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह तमाम शिवसैनिक भेट देत आदरांजली वाहतात. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात वेगळा ठसा उमटवला असून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त स्मृतीस्थळ शोभिवंत झाडांच्या फुलांनी सजवण्यात आल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी मातोश्री निवासस्थानी मृत्यू झाला होता. त्यामुळे बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमधील जागेत त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. या स्मृतीस्थळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह इतर मंत्री, शिवसेना नेते आणि शिवसैनिक व हितचिंतक आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. २३ जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त या स्मृतीस्थळाला लाखो चाहते भेट देतात. १७ नोव्हेंबर म्हणजेच रविवारी बाळासाहेबांची पुण्यतिथी असून यानिमित्ताने स्मृतीस्थळ विविध शोभिवंत झाडांच्या फुलांनी सजवण्यात आले असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती जितेंद्र परदेशी यांनी दिली.

पुणे विरार आदी ठिकाणांहून आणली शोभिवंत फुलं!

स्मृतिस्थळावरील जागेचे सुशोभिकरण करण्यासाठी पुण्यातून सुशोभित झाडांची रोपे आणली आहेत. यामध्ये रेड पॉईंटसेटीया, यलो, पॉईंटसेटीया, पिवळा व ऑरेंज झेंडू, आदी फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी ३०० फुलझाडांची रोपटी ही रेड पॉइंटसेटीया आणि २५० यलो पॉईंटसेटीयाची आहेत, तर सफेद शेवंतीची, प्लाबेगो आदींची रोपटी तसेच ग्रीन लॉन लावून स्मृतीस्थळ सुशोभित केल्याचे परदेशी यांनी सांगितले.

मणिपूर पुन्हा पेटले! दोन मंत्री, तीन आमदारांच्या घरांवर हल्ले, संचारबंदी जारी

उत्तर प्रदेशात अग्निकांड! १० नवजात बालकांचा होरपळून अंत; त्रिस्तरीय चौकशीचे राज्य सरकारचे आदेश

मुंबईकरांनो लक्ष द्या...आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रोहित शर्माला पुत्ररत्न! रितीकाने दिला मुलाला जन्म; सूर्यकुमारने केले अभिनंदन

निवडणूक जिंकण्यासाठी शक्ती पणाला लावा; पंतप्रधानांचे भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांना आवाहन