मुंबई

प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पार्सल देण्यास आता बंदी!

२६ जुलै, २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला

प्रतिनिधी

प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या मुंबई महापालिकेने प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंटेनर पर्यावरणास घातक असून कंटेनरमध्ये जेवणाचे पार्सल देणाऱ्या हाॅटेल्स व्यावसायिकांना दोन वेळा समज देण्यात येणार आहे. त्यानंतरही कंटेनरचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले तर प्लास्टिक बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले. दरम्यान, याआधी हॉटेल व्यवसायिकांची आहार संघटनेसोबत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

२६ जुलै, २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर पर्यावरणाच्या रक्षणासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर जून २०१८ पासून प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. यानंतर पालिकेच्या माध्यमातून दंड आणि कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मात्र कोरोनामुळे मुंबईत मागील दोन वर्षांपासून प्लॅस्टिक बंदी कारवाई थंडावली होती. मात्र १ जुलैपासून पुन्हा धडाक्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले अशा ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी