पीटीआय
मुंबई

वांद्रे - वरळी फक्त १० मिनिटांत; जानेवारी मध्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत कोस्टल रोडचे ९३ टक्के काम फत्ते

वरळी ते वांद्रे सी लिंक पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आता वांद्रे ते वरळी असा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. जानेवारी मध्यापर्यंत हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार असून यामुळे ४० मिनिटांचा प्रवास फक्त १० मिनिटांत होणार आहे. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पाचे ९३ टक्के काम फत्ते झाले आहे.

Swapnil S

मुंबई : वरळी ते वांद्रे सी लिंक पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आता वांद्रे ते वरळी असा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. जानेवारी मध्यापर्यंत हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार असून यामुळे ४० मिनिटांचा प्रवास फक्त १० मिनिटांत होणार आहे. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पाचे ९३ टक्के काम फत्ते झाले आहे.

आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून सोयीसुविधा मध्ये वाढ करणे काळाची गरज आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूल, भूमिगत रस्ते तयार करण्यात येत असून कोस्टल रोड प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते वांद्रे सी लिंक पहिला टप्पा १२ सप्टेंबर २०२४ ची प्रवासी सेवेत दाखल झाला आहे. तर दुसरा टप्पा वांद्रे ते वरळी जानेवारी मध्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.

कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान दुसऱ्या बोगद्यातील वरळीकडे जाणारी लेन ११ जून २०२४ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. वांद्रे सी लिंक ते वरळी दुसरा टप्पा जानेवारी मध्यापर्यंत प्रवासी सेवेत दाखल होईल, असा विश्वास पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.

३४ टक्के इंधन तर, ७० टक्के वेळेची बचत!

किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. यामुळे सुमारे ७० टक्के वेळेची बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे. तसेच ध्वनिप्रदूषण व वायू प्रदूषणात घट होण्यास मदत होणार आहे.

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या

भारत-चीन हे विकासाचे भागीदार; पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची ठाम भूमिका

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर