मुंबई

पोलीस ठाण्यातून बांगलादेशी आरोपीचे पलायन

Rakesh Mali, प्रतिनिधी

मुंबई : शहरात अनधिकृत वास्तव्य केल्याप्रकरणी शिक्षा भोगलेल्या एका बांगलादेशी नागरिकाने पोलीस ठाण्यातून पलायन केल्याची धक्कादायक घटना कुरार पोलीस ठाण्यात घडली. बांगलादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू असताना या आरोपीचे पलायन केल्याने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कमरुल अन्नूउद्दीन काझी असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांनी मुंबई शहरात अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरू असतानाच गेल्या वर्षी कमरुल काझी याला मालाड येथून कुरार पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली होती. चौकशीदरम्यान तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले होते. बांगलादेशातून पळून आल्यानंतर तो काही महिन्यांपासून मुंबई शहरात वास्तव्यास होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून नंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध किल्ला कोर्टात खटला सुरू होता.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल