मुंबई

सार्वजनिक मंडळांतील बाप्पाचे वाजतगाजत आगमन

नवशक्ती Web Desk

मुंबई : आकर्षक, २५ फूट उंच गणेश मूर्तीचे रविवार ३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत वाजत गाजत आगमन झाले. खेतवाडीचा विघ्नहर्ता, मुंबा देवीचा सम्राट, जोगेश्वरीचा राजा, गिरणगावचा राजा, फोर्टचा राजा, ताडदेवचा राजा, लव्हलेनचा राजा, मलबार हिलचा राजा आदी २५ हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पाचे आगमन झाले. लाडक्या गणरायाचे आगमन होत असतानाची एक झलक पाहण्यासाठी परळ वर्क शॉप येथे भक्तांची मोठी गर्दी झाली होती. रस्त्यांच्या दुतर्फा झालेली गर्दी लक्षात घेता पोलिसांनी बॅरिकेड्स केल्याने बेस्टच्या बसेस अन्य मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.

रविवार, ३ सप्टेंबर रोजी २५हून अधिक गणपती मंडळांच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. दरम्यान, गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने गिरीष वालावलकर, दिलीप खंडागळे, अमित कोकाटे, आशिष नरे, गणेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आगमन मिरवणूक चालू होती.

आज आमगन झालेले बाप्पा

अखिल चंदनवाडी, मालाडचा राजा गोरसवाडी, खेतवाडीचा विघ्नहर्ता, मुंबईचा सम्राट, मुंबादेवीचा गणराज, जोगेश्वरीचा राजा, गिरणगावचा राजा, भोईवाडाचा महाराजा, श्रीनगरचा महाराजा, नटराज मार्केटचा राजा,धारावीचा वरदविनायक, गौरीपाड्याचा गौरीनंदन, साकीनाक्याचा महाराजा, कोल्हापूरचा गणाधीश, मलबार हिलचा राजा, ग्रॅन्ट रोडचा महागणपती, कुलाब्याचा सम्राट, मेट्रोचा राजा, फोर्टचा राजा, मुंबईचा महाराजा, खेतवाडीचा राजा, मुंबईचा एकटा राजा, २री खत्तर गल्लीचा मोरया, लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर, ताडदेवचा राजा, लव्हलेनचा राजा, मुंबईचा मोरया, पंचशीलचा विघ्नहर्ता

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस