मुंबई

बीसीसीआय झाली मालामाल, टीव्ही प्रसारण हक्कांची हजारो कोटींना विक्री

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ट्विट करून वायाकॉमचे अभिनंदन केले असून लिलावात बोली लावणाऱ्यांचेही आभार मानले आहेत

वृत्तसंस्था

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू असलेला इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) माध्यम हक्कांचा लिलाव मंगळवारी अखेर संपला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी ट्विट करून याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली.

अधिकृत माहितीनुसार आता २०२३ ते २०२७ या काळात आयपीएलचे टीव्ही प्रसारण हक्क स्टारकडे आणि डिजिटल राइट्स वायाकॉमकडे (रिलायन्स) असणार आहेत. पाच वर्षांसाठीच्या एकूण चार पॅकेजेसला ४८ हजार ३९० कोटी मिळाले आहेत.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ट्विट करून वायाकॉमचे अभिनंदन केले असून लिलावात बोली लावणाऱ्यांचेही आभार मानले आहेत. जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, वायकॉम-१८ ने २३ हजार ७७५ कोटी रुपयांना डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. भारताने डिजिटल क्रांती पाहिली आहे आणि या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. डिजिटलने आपला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, म्हणूनच खेळाच्या वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे.

वायाकॉम-१८ ने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंग्डममधील प्रसारणाचेही हक्क विकत घेतल्याची माहिती जय शाह यांनी दिली. टाइम्स इंटरनेटने मध्य पूर्व आणि अमेरिकेतील सर्व हक्क विकत घेतले आहेत. टाम्सकडे इतर देशांचेही हक्क असतील, अशी माहिती बीसीसीआय सचिवांनी दिली.

जय शाह यांनी आणखी एक ट्विट केले की, या लिलावात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो. विजेत्यांना बीसीसीआय सर्वतोपरी मदत आणि समर्थन देईल. या लिलावातून बीसीसीआयला जे काही उत्पन्न मिळेल ते देशांतर्गत क्रिकेटला मजबूत करण्यासाडी वापरले जाईल.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे