‘बेस्ट’चा पुन्हा अपघात! मानखुर्द येथे पादचाऱ्याला चिरडले; चालक, वाहकासह १० जखमी  (Photo-X)
मुंबई

‘बेस्ट’चा पुन्हा अपघात! मानखुर्द येथे पादचाऱ्याला चिरडले; चालक, वाहकासह १० जखमी

भांडुप येथे पादचाऱ्याला बेस्ट बसने जोरदार धडक दिल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी मानखुर्द - सायन - पनवेल हायवेजवळ विश्वकर्मा रुग्णालयासमोर ‘बेस्ट’ बस दुभाजकाला धडकली.

Swapnil S

मुंबई : भांडुप येथे पादचाऱ्याला बेस्ट बसने जोरदार धडक दिल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी मानखुर्द - सायन - पनवेल हायवेजवळ विश्वकर्मा रुग्णालयासमोर ‘बेस्ट’ बस दुभाजकाला धडकली. या घटनेत भास्कर रावसाहेब कागदे (६२) यांना बसने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक, वाहकासह १० प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. दरम्यान, उपमहापौर संजय घाडी आणि बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

भांडुप कोकण नगर परिसरात ८ जुलै रोजी बेस्ट बसने पादचाऱ्याला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेस १२ दिवस उलटत नाही तोच सोमवारी मानखुर्द-पनवेल हायवेजवळ, विश्वकर्मा रुग्णालयासमोर बेस्ट परिवहन विभागाच्या (मार्ग क्र. ५०१) एका बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्याच्या दुभाजकाला आणि पादचाऱ्याला धडक दिली. सकाळच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून चालक, वाहकास १० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

जखमींना राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील मातेश्वरी कंत्राटदाराची प्रतिक्षानगर आगाराची (मार्ग क्रमांक ५०१/३४ बस क्रमांक: ८०९१) बसगाडी कुर्ला बस स्थानक (पूर्व) ते ऐरोली या मार्गावर सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास प्रवास करीत असताना, बस चालक बनवारीलाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसगाडी मानखुर्द, सायन - पनवेल हायवे, विश्वकर्मा रुग्णालयासमोर मानखुर्द ब्रिजच्या कठड्यावर जाऊन जोरात आदळली.

या भीषण अपघातात बस चालकाकडील बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. तसेच, या अपघातात रस्त्यावरील दुभाजकाजवळ उभे असलेले पादचारी भास्कर रावसाहेब कागदे (६२) यांचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर, या अपघातात बस चालक, बस वाहकासह १० जण जखमी झाले.

अपघातात मृत्यू

भास्कर रावसाहेब कागदे (६२)

जखमींची नावे

  • शिवमंगल मैथी (४२) प्रवासी

  • गणेश पटेल (२४) प्रवासी

  • शंकर साठे (४७) प्रवासी

  • संकेत नाकती (२५) प्रवासी

  • राजेश वरुगणिये (३५) प्रवासी

  • अंकिता जाधव (महिला/२२) प्रवासी

  • रंजना घोरपडे, (महिला/५३) प्रवासी

  • लता वाघेला ( महिला/४२) प्रवासी

राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल जखमी

  • बनवारीलाल शर्मा (४९) - बस चालक

  • वैभव सुखदेव वाघमारे (४१) बस वाहक

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया